Devendra Fadnavis : महिला मंत्री नाहीत, हा आक्षेप लवकरच दूर होईल; देवेंद्र फडणवीसांची माहिती, विरोधकांवरही केली टीका

| Updated on: Aug 09, 2022 | 4:38 PM

ज्या पक्षाचे दोन मंत्री भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जेलमध्ये असतील आणि अनेक नेत्यांवर त्या ठिकाणी खटले सुरु असतील, अशा पक्षाने पहिल्यांदा स्वत:चा आरसा पाहावा आणि नंतर त्यांनी अशा प्रकारची टीका करावी, असा टोला फडणवीसांनी विरोधकांना लगावला.

पुणे : महिला मंत्री नाही हा जो आक्षेप आहे तो लवकरच दूर होईल आणि महिलांना योग्य प्रतिनिधित्व आमच्या मंत्रिमंडळात (Cabinet) मिळेल. त्यांनीही पहिल्यांदा विस्तार केला तेव्हा पाच मंत्री घेतले, त्यात कुठलीही महिला घेतली नव्हती. त्यामुळे त्यांना असं बोलण्याचा काहीही अधिकार नाही, असा पलटवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)  यांनी केलाय. आज मंत्रिमंडळ विस्तार झाला. या मंत्रिमंडळ विस्तारात एकाही महिला नेत्याला स्थान देण्यात आलेलं नाही. त्यावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. त्यावर विचारले असता त्यांनी विरोधकांवर (Opposition) पलटवार केला. ते म्हणाले, की ज्या पक्षाचे दोन मंत्री भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जेलमध्ये असतील आणि अनेक नेत्यांवर त्या ठिकाणी खटले सुरु असतील, अशा पक्षाने पहिल्यांदा स्वत:चा आरसा पाहावा आणि नंतर त्यांनी अशा प्रकारची टीका करावी, असा टोलाही फडणवीस यांनी लगावलाय. संजय राठोड यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे, असं सांगत फडणवीसांनी अधिक बोलणं टाळलं.

Published on: Aug 09, 2022 04:38 PM
मूळात बेकायदेशीर सरकारने आज मंत्रीपदाची शपथ घेतली – रुपाली ठोंबरे
Jayant Patil : …आता मंत्र्यांनी तातडीनं कामाला लागावं, विरोधक म्हणून आम्ही आमची जबाबदारी पार पाडूच : जयंत पाटील