राज्यात ओबीसी आरक्षण कसं लागू झालं, देवेंद्र फडणवीसांनी सविस्तर सांगितलं
ओबीसी आरक्षण लागू झालंय. 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देता येत नाही. त्यामुळं काही ठिकाणी कमी टक्के आरक्षण मिळाल्याचं फडणवीस म्हणाले.
मुंबई : गेली अडीच वर्षे सरकारमधील काही मंत्र्यांमध्ये इच्छाशक्तीचा अभाव होता. ज्या गोष्टी चार महिन्यात झाल्या त्या अडीच वर्षात का झाल्या नाही. ज्या गोष्टी पंधरा दिवसात केल्या त्या अडीच वर्षात का झाल्या नाही, असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. पाच मार्च 2020 ला इम्पेरिकल डाटा तयार करा, असं मी सांगितलं होते. पण, राज्य सरकार केंद्राकडं बोट दाखवित होते. मध्य प्रदेशमध्ये हीच परिस्थिती आली. मी त्यांना सांगितलं. त्यानुसार काम केलं. त्यामुळं मध्य प्रदेशात आधी ओबीसी आरक्षण मिळालं. राज्यात सत्तेवर आल्यावर लगेच काम सुरू केलं. आयोगाला सूचना दिली. त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं बाजू मांडली. त्यामुळं ओबीसी आरक्षण लागू झालंय. 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देता येत नाही. त्यामुळं काही ठिकाणी कमी टक्के आरक्षण मिळाल्याचं फडणवीस म्हणाले.
Published on: Jul 23, 2022 09:01 PM