Devendra Fadnavis : ‘बुद्धिबळाप्रमाणेच राजकारणातही डोळ्यात तेल घालून दक्ष राहावं लागतं’, सत्तासंघर्षाबाबत फडणवीसांचं महत्वाचं वक्तव्य
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा भाजपचं विरोधी पक्षात बसणं आणि महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेबाबत महत्वाचं वक्तव्य केलं आहे. बुद्धिबळाप्रमाणेच राजकारणातही डोळ्यात तेल घालून दक्ष राहावं लागतं. एकही चाल चुकली तर पराभव ठरलेला असतो, असं फडणवीस म्हणाले.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा भाजपचं विरोधी पक्षात बसणं आणि महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेबाबत महत्वाचं वक्तव्य केलं आहे. बुद्धिबळाप्रमाणेच राजकारणातही डोळ्यात तेल घालून दक्ष राहावं लागतं. एकही चाल चुकली तर पराभव ठरलेला असतो. आम्हीही 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अशाच एका चुकीमुळे पराभूत झालो होतो. तशा चुका तुम्ही करू नका’, असं सांगत फडणवीस यांनी सत्तासंघर्षाबाबत भाष्य केलं. पुण्यातील बालेवाडीमध्ये क्रीडामंत्री सुनील केदार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बुद्धीबळ स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळी या दोन्ही नेत्यांनी एकमेकांका कोपरखळी लगावल्याचं पाहायला मिळालं.
Published on: Jun 01, 2022 12:22 PM