Nana Patole on Fadnavis | राज्यपालांच्या कृपेनेच दोघांचे सरकार, देवेंद्र फडणवीस हे बिनखात्याचे मंत्री, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटेल यांनी साधला निशाणा

| Updated on: Jul 22, 2022 | 3:32 PM

Nana Patole on Fadnavis News | महाविकास आघाडी सरकार पाडण्यात ईडीचा मोठा हात असून राज्यपालांच्या कृपेने राज्यात दोघांचे सरकार आल्याचे त्यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस हे बिनखात्याचे मंत्री असल्याची टीका ही त्यांनी केली.

Nana Patole on Fadnavis News | महाविकास आघाडी सरकार(Mahavikas Aaghadi Government) पाडण्यात ईडीचा(ED) मोठा हात आहे. राज्यपाल (Governor) भगतसिंग कोश्यारी यांच्या कृपेनेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचं सरकार आल्याची घणाघाती टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य केले. देवेंद्र फडणवीस हे बिनखात्याचे मंत्री असल्याची टीका ही त्यांनी केली. सामाजिक न्याय विभागाचा कोट्यवधींचा निधी राज्य सरकारने थांबवलाय, त्यावर प्रतिक्रिया देताना हे सरकार सूडाचे राजकारण करत असल्याचा आरोप केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तर राज्यात बदल घेणारं स्थापन करावं असा सल्ला दिला आहे. त्यामुळे बदला घेण्याची पद्धत राज्यात रुजू होत आहे. तीच भाजप प्रदेशाध्यक्षांच्या तोंडी आल्याचे त्यांनी सांगितले. विकास कामांना स्थगिती देणे हे राज्यासाठी चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले.

Video : निधीसाठी आदित्य आणि उद्धव ठाकरे यांना 100 पत्र लिहिली- सुहास कांदे
ज्यांच्याकडे जास्त संख्या त्यांचाच पक्ष खरा- रावसाहेब दानवे