देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांनी काय केले आवाहन ?

| Updated on: Dec 25, 2024 | 7:13 PM

बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे विरोध पक्षाने येत्या 28 डिसेंबर रोजी बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्व पक्षीय मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या मोर्चात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया देखील सहभाग होणार आहेत.

बीड येथील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आल्यानंतर देशात बीड जिल्ह्याचे नाव बदनाम झाले आहे. बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर 28 तारखेला सर्व पक्षीय मोर्चा काढण्यात काढण्यात येणार आहे. या मार्चात आपण देखील सहभागी होणार असल्याचे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्यात विरोधकांनी जरुर जावे, परंतू राजकारण आणि पर्यटन करु नये अशी टीका केली आहे. त्यावर अंजली दमानिया यांनी देवेंद्रजींनी पर्यटन म्हणून तरी बीडला एकदा जावे, तेथे त्यांचे आता मित्र झालेल्या धनंजय मुंडे यांची किती दहशत आहे हे एकदा पाहावे, तेथे कोणी आपल्या जमीनीदेखील विकू शकत नाही असे अजंली दमानिया यांनी म्हटले आहे.

 

Published on: Dec 25, 2024 07:12 PM
सदावर्ते यांच्या ताब्यात गेल्यानंतर एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CID चे अप्पर पोलीस महासंचालक बीडमध्ये दाखल