अजितदादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार? पाहा देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले
अजित पवार मुख्यमंत्री होणार या चर्चा सध्या जोरात सुरु आहेत. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सहकुटुंब दिल्ली दौरा आणि अमोल मिटकरी यांच्या ट्वीटने चर्चांना उधाण आलं आहे. या सर्व चर्चांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई, 25 जुलै 2023 | अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून ते मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांना सध्या प्रचंड उधाण आलं आहे.त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सहकुटुंब दिल्ली दौरा आणि अमोल मिटकरी यांचं ट्विट यामुळे राज्याच्या राजकारणात एकच चर्चा सुरु आहे. या सर्व चर्चांवर अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मौन सोडले आहे. आता अखेर भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, “कुठल्याही पक्षातील लोकांना असं वाटणं की, आपल्या पक्षाचे नेते मुख्यमंत्री झाले पाहिजेत, यात वावगं काही नाहीय. राष्ट्रवादीवाल्यांना वाटू शकतं की, अजित पवार मुख्यमंत्री झाले पाहिजेत. आमच्या पक्षातील लोकांना वाटू शकतं की भाजपचा मुख्यमंत्री झाला पाहिजे. शिवसेनेचे मुख्यमंत्री आज आहेत. मात्र….”, देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले यासाठी पाहा हा व्हिडीओ…