एकनाथ खडसे भाजपमध्ये येणार का?, फडणवीस म्हणाले…

| Updated on: Sep 24, 2022 | 11:51 AM

एकनाथ खडसे भाजपमध्ये येणार का?, असं विचारलं असता फडणवीस म्हणाले...

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषद आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) पुन्हा एकदा भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह आणि एकनाथ खडसे यांच्यात फोनवरून चर्चा झाली असल्याची माहिती खासदार रक्षा खडसे यांनी दिलीय. त्यानंतर आता खडसेंच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरु झाली आहे. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना विचारल असता त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मला याबद्दल कल्पना नाही, असं फडणवीस म्हणालेत. खडसेंनी मात्र भाजपत जाण्याच्या चर्चांचं खंडण केलं आहे.

Published on: Sep 24, 2022 11:47 AM
Video | दसरा मेळावा; मनसेचं उद्धव ठाकरेंना आव्हान काय?
“…तर शिंदे सरकार कोसळणारच”, घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं विधान