अखेर मुहुर्त ठरला! ‘या’ दिवशी होणार राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार, देवेंद्र फडणवीस यांनी केलं जाहीर…
राज्यात शिंदे-फडणवीस सरकारला स्थापन होऊन आज एक वर्ष पूर्ण झालं. मात्र अजून मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आलेला नाही. आता स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार हे जाहीर केलं आहे.
औरंगाबाद: राज्यात शिंदे-फडणवीस सरकार येऊन आज एक वर्ष पूर्ण झालं. मात्र अजूनही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. छोटेखानी मंत्रिमंडळाची स्थापना केल्यानंतर लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल, असं वारंवार सांगण्यात आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अनेकदा दिल्लीवाऱ्याही झाल्या. मात्र, मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय लांबणीवरच पडला. अखेर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खूशखबर दिली आहे. “देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्याचे अनेक प्रश्न असतात. त्यासंदर्भात दिल्लीला जाऊन भेट घ्यावी लागते, त्याचा पाठपुरावा करावा लागतो. अनेकवेळा त्यासंदर्भातील बैठकाही असतात. आम्हाला मंत्रिमंडळ विस्तारही करायचा आहेच. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याबाबत निर्णय घेतीलच. मला वाटतं जुलै महिन्यात आम्ही विस्तार करू.केंद्र आणि राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा आपआपसात काहीही संबंध नाही. केंद्राचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार हे आम्हाला माहितीही नाही. आम्हाला राज्याच्या विस्तारात जास्त रस आहे.”