संजय राऊत निर्बुद्धपणे बोलतात, त्यांना काय उत्तर देणार?; देवेंद्र फडणवीस यांचं टीकास्त्र
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना ठाकरेगटाचे नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तसंच उद्धव ठाकरेंवरही त्यांनी टीका केली आहे. पाहा...
मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना ठाकरेगटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राजकारणात परिस्थिती कधीही बदलू शकते. पण इतकं निराश होऊन काही बोलायचं नसतं. संजय राऊत निर्बुद्धपणे बोलतात. अशा निर्बुद्ध लोकांना काय उत्तर देणार?, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी राऊतांवर टीका केली आहे. तसंच उद्धव ठाकरेंवरही त्यांनी टीका केली आहे. ठाकरेंकडे मोजके शब्द आहेत. तेच शब्द फक्त फिरवून फिरवून वापरत असतात, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Published on: Feb 21, 2023 03:33 PM