ठाकरे म्हणाले, ‘मोदी संपलेलं नाणं!’, देवेंद्र फडणवीसांचं जशास तसं उत्तर, म्हणाले…
उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे. त्याला आता फडणवीसांनी उत्तर दिलंय.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कायम खणखणीत वाजत राहणारं नाणं आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले आहेत. उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे. शिंदेगटाकडे नोटबंदीनंतर नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे घासलेलं आणि संपलेलं नाणं आहे. आपल्याकडे बाळासाहेब ठाकरेंसारखं खणखणीत नाणं आहे. त्यामुळे कुणीही खचू नका, असं उद्धव ठाकरे म्हणालेत. त्याला आता फडणवीसांनी उत्तर दिलंय.
Published on: Oct 09, 2022 03:20 PM