अमृतकालातील सर्वजनहिताय अर्थसंकल्प; देवेंद्र फडणवीस यांची अर्थसंकल्पावर पहिली प्रतिक्रिया

| Updated on: Feb 01, 2023 | 1:51 PM

आज देशाचा अर्थसंकल्प सादर झालाय. यावर उपमु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय. पाहा ते काय म्हणालेत...

आज देशाचा अर्थसंकल्प सादर झालाय. यावर उपमु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय. ‘अमृतकालातील सर्वजनहिताय अर्थसंकल्प’, या संकल्पनेवर आधारित यंदाचा अर्थसंकल्प आहे, अशी पहिली प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. समाजातील शेवटच्या व्यक्तीचा विचार करत गरीब, मध्यमवर्गीय, शेतकरी, उद्योजक आणि युवा अशा सगळ्या लोकांचा विचार या अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. विकसित राष्ट्राकडे जाण्याच्या मार्गातील महत्वाचा दुवा हा यंदाचा अर्थसंकल्प आहे, असंही फडणवीस म्हणालेत.

Published on: Feb 01, 2023 01:51 PM
अर्थसंकल्पावर मंत्री दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया; पाहा काय म्हणाले…
निवडणुका नसल्यानं महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसली, विजय वडेट्टीवार यांची टीका