Devendra Fadnavis: अडीच वर्षात प्रधानमंत्री आवास योजनेचे केवळ काम 12 टक्केच
यामध्ये जवळपास 76 टक्के घरांची गरज असताना केवळ 12 टक्के काम अडीच वर्षात झाले आहे. यामध्ये पैसे असून कामे झाली नसल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
मुंबई – आजची बैठक ही केंद्र सरकारकडून(Central Government) राबवन्यात येणाऱ्या अडचणी सोडवण्याच्या संदर्भाने ही बैठक होती. काही योजना अत्यंत चांगल्या पद्धतीने राबवल्या गेल्यात मात्र काही योजना मागे पडल्या आहेत. उदारणार्थ प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ही 76 टक्के झाली आहे. प्रधानमंत्री आवास योजना शहरी(City) ही केवळ बारा टक्के झाली आहे. यामध्ये जवळपास 76 टक्के घरांची गरज असताना केवळ 12 टक्के काम अडीच वर्षात झाले आहे. यामध्ये पैसे असून कामे झाली नसल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis)यांनी केला आहे.
Published on: Aug 01, 2022 04:01 PM