Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीस यांनी केली मुख्यमंत्र्यांच्या घरी बाप्पांची आरती, आज ठाणे येथील घरी उपमुख्यमंत्री
Devendra Fadnavis | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील घरी भेट दिली.
Devendra Fadnavis | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या ठाणे येथील घरी भेट दिली. त्यांनी यावेळी बाप्पांची आरती केली. राज्यात सत्तांतर नाट्यानंतर हे सरकार सुखरुपरित्या आले आणि आता स्थिरस्थावर ही झाले आहे. बंडखोर आमदारांच्या (Rebel MLA) मदतीने राज्यात भाजपने सरकारचा पर्याय दिला आणि सरकारने एक महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. त्यानंतर गणेशोत्सवाच्या निमित्ताने फडणवीसांचा ताफा शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानाकडे वळला. त्यांनी बाप्पांची मनोभावे आरती केली. बाप्पांचे दर्शन घेतले. या दोघांमध्ये चर्चा झाली. यावेळी कपिल पाटील, डॉ. श्रीकांत शिंदे आणि निरंजन डावखरे यांची उपस्थिती होती. सततच्या व्यापातून वेळ काढत देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची ही घरगुती भेट त्यांच्या या सत्तांतर नाट्यानंतरचा मोठा ब्रेक तर नसेल ना?