पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका

| Updated on: May 18, 2024 | 2:14 PM

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सध्या शाखांना भेटी देत आहेत. अशातच ठाकरे आज विक्रोळी येथील टागोरनगर या परिसरात आले होते. त्यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा फडतूणवीस असं संबोधत त्यांचा उद्धार केला आहे.

Uddhav Thackeray On Devendra Fadnavis : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील प्रचार आज संपत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हे आज शाखांना भेटी देत आहेत. नुकतेच उद्धव ठाकरे विक्रोळीच्या टागोरनगरमध्ये आले. त्यावेळी त्यांनी सभेला संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फडतूणवीस असं संबोधन उद्धार केला. त्याच बरोबर काल या ठिकाणी झालेल्या मारहाणीत जे पोलिस होते त्यांची नावे मला द्या. मग बघतो पुढे काय करायचं. पोलिस भाजप किंवा फडणवीसांचे नोकर नाहीत. तुम्ही जनतेचे सेवक आहेत. असा इशाराच उद्धव ठाकरे यांनी दिला.

Published on: May 18, 2024 02:13 PM
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव्य