संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अशा प्रकारचं वक्तव्य हे…”
शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे ते चांगलेच वादात सापडले आहेत. संभाजी भिडे यांच्या निषेधार्थ काँग्रेसकडून राज्यात आंदोलन करण्यात येत आहेत. यावर आता उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई, 30 जुलै, 2023 | शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे ते चांगलेच वादात सापडले आहेत. संभाजी भिडे यांच्या निषेधार्थ काँग्रेसकडून राज्यात आंदोलन करण्यात येत आहेत. यावर आता उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “संभाजी भिडे गुरुजींनी जे वक्तव्य केलंय त्याचं मी पूर्णपणे निषेध करतो. महात्मा गांधी हे देशाचे राष्ट्रपिता आहेत. देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये महात्मा गांधी याच्यांकडे महानायक म्हणून पाहिलं जातं. महानायकाबाबत असं अनुचित वक्तव्य करणं चुकीचं आहे. माझं स्पष्ट मत आहे की अशा प्रकारचं वक्तव्य हे भिडे गुरुजी आणि कुणीही करु नये.”
Published on: Jul 30, 2023 02:39 PM