Special Report | फडणवीस दिल्लीत, अंतिम यादी निश्चित?

| Updated on: Aug 04, 2022 | 8:39 PM

पहिल्या मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार आणि कोणा कोणाला मंत्री बनवायचं याबाबत राज्यातील भाजप नेते द्विधा मनस्थितीत आहेत. त्याचबरोबर शिंदे गटातील कोण मंत्री होणार आणि कोणाला किती सत्तेत वाटा मिळणार, ही चिंताही शिंदे गटातील नेत्यांमध्ये असल्याचे बोलले जात आहे.

महाराष्ट्रातील महिनाभरापूर्वीचेच जुने सरकार नवे मंत्रिमंडळ स्थापन करणार आहे. मात्र, त्याच्या एक दिवस आधीच महाराष्ट्र सरकारमधले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देऊन गुरुवारी सर्व सभेंचे कार्यक्रम रद्द केले आहेत. तर दुसरीकडे, दुसरे चाक म्हणजेच देवेंद्र फडणवीसानीही आपली सर्व कामं सोडून दिल्लीला रवाना झाले आहेत. राजकीय विश्लेषकांच्या मते आगामी मंत्रीमंडळाच्या यादीवर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून शिक्कामोर्तब करण्यासाठी फडणवीस दिल्लीत आले आहेत. असं असलं तरी पहिल्या मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार आणि कोणा कोणाला मंत्री बनवायचं याबाबत राज्यातील भाजप नेते द्विधा मनस्थितीत आहेत. त्याचबरोबर शिंदे गटातील कोण मंत्री होणार आणि कोणाला किती सत्तेत वाटा मिळणार, ही चिंताही शिंदे गटातील नेत्यांमध्ये असल्याचे बोलले जात आहे.

Published on: Aug 04, 2022 08:39 PM
Deepak Kesarkar on Cabinet Expansion | मंत्रिमंडळ विस्तारावर दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया
Priyanka Chaturvedi After Hearing |आम्ही जागेवर आहोत पळतंय कोण ते बघा, प्रियांका चतुर्वेदींचा घणाघात