उद्धव ठाकरे यांच्या ‘त्या’ टीकेवर देवेंद्र फडणवीस यांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “इतकी बालबुद्धी…”

| Updated on: Jun 25, 2023 | 10:56 AM

"देवेंद्रजी परिवार तुम्हालाही आहे. तुमच्याही परिवाराचे व्हॉट्सअप बाहेर आले आहेत. आम्ही त्यावर अजून बोललो नाही. आम्ही त्यावर बोललो तर तुम्हाला शवासन करावं लागेल. तुम्हाला कोणतीही आसनं झेपणार नाही. फक्त झोपावं लागेल," असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. त्यांच्या या टीकेनंतर देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरुन प्रत्युत्तर दिलं आहे.

मुंबई : ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुन्हा एकदा शाब्दिक युद्ध रंगलं आहे. पाटण्यातील बैठकीवरून देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केली होती. विरोधक परिवार वाचवा बैठकीसाठी पाटण्याला गेले आहेत, अशी टीका फडणवीस यांनी केली. यालाच प्रत्युत्तर म्हणून उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांना आव्हान दिलं आहे. “देवेंद्रजी परिवार तुम्हालाही आहे. तुमच्याही परिवाराचे व्हॉट्सअप बाहेर आले आहेत. आम्ही त्यावर अजून बोललो नाही. आम्ही त्यावर बोललो तर तुम्हाला शवासन करावं लागेल. तुम्हाला कोणतीही आसनं झेपणार नाही. फक्त झोपावं लागेल,” असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. त्यांच्या या टीकेनंतर देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरुन प्रत्युत्तर दिलं आहे. देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले यासाठी पाहा यासंदर्भातील व्हिडीओ…

Published on: Jun 25, 2023 10:56 AM
थरकाप उडवणारी घटना; दैवबलवत्तर म्हणून मोठा अनर्थ टळला; धावत्या बसचे चाक निखळले; नेमकं कुठं घटलं हे?
पहिल्या पावसातच एसटीबसची पोलखोल; छत असूनही प्रवाशांना घ्यावी लागते छत्री