Devendra Fadnavis | वरळीतून भ्रष्टाचाराची हंडी फोडण्याचा इशारा : देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis | वरळीतून भ्रष्टाचाराची हंडी फोडण्याचा इशारा : देवेंद्र फडणवीस

| Updated on: Aug 19, 2022 | 10:22 PM

गोंविंदांची सुरक्षा इन्शुअर केली आहे. सगळ्यांना शुभेच्छा. गोंविंदांना साहसी खेळाचा दर्जा दिला आहे. मोदीजींच्या नेतृत्वात भ्रष्टाचाराची हंडी फोडत आहोत, असे फडणवीस यावेळी म्हणाले.

Devendra Fadnavis | वरळीतून भ्रष्टाचाराची हंडी फोडण्याचा इशारा : देवेंद्र फडणवीस-TV9

मुंबई : शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांचा वरळी मतदारसंघातील जांबोरी मैदानात भाजपतर्फे दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी फडणवीस यांनी जनतेशी संवाद साधताना आदित्य ठाकरे यांना टोला लगावला आहे. आपणा सर्वांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा. तुमच्या हातून हंडी फुटो, मलई मिळो. मोदींच्या नेतृत्वाखाली भ्रष्टाचाराची हंडी फोडतोय. विकासाची मलई मिळेल. गोंविंदांची सुरक्षा इन्शुअर केली आहे. सगळ्यांना शुभेच्छा. गोंविंदांना साहसी खेळाचा दर्जा दिला आहे. मोदीजींच्या नेतृत्वात भ्रष्टाचाराची हंडी फोडत आहोत, असे फडणवीस यावेळी म्हणाले.

Anil Parab | कोण कोणाची हंडी फोडणार हे जनताच ठरवेल
Chhagan Bhujbal Helped Accident Victims | अपघातग्रस्तांच्या मदतीला भुजबळ धावले