Maharashtra politics : भाजप आज राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा करणार!
आज सकाळी 11 वाजता भाजपाची (BJP) महत्त्वाची बैठक आहे. या बैठकीनंतर भाजप राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
नव्या सरकारच्या सत्तास्थापनेबाबत महत्त्वाची माहिती समोर येत आहे. आज सकाळी 11 वाजता भाजपाची महत्त्वाची बैठक आहे. या बैठकीनंतर भाजप राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या बैठकीला चंद्रकांत पाटील, मुनगंटीवार शेलार यांच्यासह भाजपाचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. उद्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.
Published on: Jun 30, 2022 09:42 AM