आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार; अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईची तरतूद होणार?

| Updated on: Mar 09, 2023 | 8:20 AM

मुंबई : आज महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. अवघ्या राज्याचं या अर्थसंकल्पाकडे लक्ष लागलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस हे अर्थसंकल्प सादर करतील. कोणत्या विभागाला काय मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई मिळणार का? त्याबाबत काही तरतूद […]

मुंबई : आज महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. अवघ्या राज्याचं या अर्थसंकल्पाकडे लक्ष लागलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस हे अर्थसंकल्प सादर करतील. कोणत्या विभागाला काय मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई मिळणार का? त्याबाबत काही तरतूद केली जाते का हे पाहणं महत्वाचं असेल. आज सादर होणाऱ्या राज्याच्या अर्थसंकल्पाकडे पुणेकरांचंही विशेष लक्ष असेल. पुणे शहराचे अनेक प्रकल्प रखडलेल्या अवस्थेत आहेत. आजच्या अर्थसंकल्पात पुण्यासाठी काय मिळणार,याची सध्या चर्चा होतेय.

Published on: Mar 09, 2023 08:20 AM
अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं निधन
अमित शाह यांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा; अज्ञात कार अचानक ताफ्यात घुसली, एकच खळबळ