‘फडणवीस तुम्ही काल चक्रव्युह रचला पण…,’ काय म्हणाले मनोज जरांगे

| Updated on: Feb 26, 2024 | 5:32 PM

मनोज जरांगे पाटील यांनी काल सागर बंगल्यावर जाण्याचा निर्णय मागे घेतला. त्यानंतर आपण उपोषण देखील स्थगित करीत असल्याचे जाहीर केले आहे. आपण दोन दिवसानंतर आपली पुढील भूमिका स्पष्ट करू असे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. डॉक्टरांचा सल्ला घेऊन आपण उपचार घेणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

जालना | 26 फेब्रुवारी 2024 : मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेत असल्याची घोषणा केली आहे. मात्र, याच वेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप केले आहेत. तुम्ही काल आमच्यासाठी चक्रव्यूह रचला होता. रात्री पाच हजार महिला आणि 25 हजार पुरुष होते. देवेंद्र फडणवीस याचं स्वप्न होतं की, राज्यात पुन्हा दंगल व्हावी. परंतू आम्ही होऊ दिली नाही. पोलिसांनी काल आमच्या मराठ्यांवर लाठीचार्ज केला असता तर त्याला जर काही प्रत्युत्तर मराठा समाजाने दिले असते तर राज्य जळाले असते असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस तुम्ही गृहमंत्री आहात. जरा विचार करुन पाहा. काल काय झाले असते. तुम्ही लपून बसला असता बंगल्यात. परंतू राज्य जळाले असते. याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील विचार करणे गरजेचे आहे. राज्यभरातील नागरिकांनी देखील यावर विचार करावा असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. फडणवीस तुम्ही सगे-सोयरेच्या नोटीफिकेशनची तातडीने अमलबजावणी करा, मराठ्यांच्या नाराजीची लाट अंगावर घेऊ नका असे आवाहनही जरांगे पाटील यांनी केले आहे.

Published on: Feb 26, 2024 05:31 PM
WITT Global Summit : वडिलांच्या ‘त्या’ एका शब्दानं आयुष्मान स्टार बनला, बघा कोणता सांगितला किस्सा?
‘जरांगे कधी खोटं बोलत नाहीत, त्यांनी…,’ काय म्हणाले कैलास गोरंट्याल