Dhananjay Deshmukh : आरोपींना वाचवण्यासाठी प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न सुरू; धनंजय देशमुखांचा आरोप
Santosh Deshmukh Case : ठराविक लोकांकडून आरोपींचे समर्थन, प्रकरण मागे टाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप आज संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी केला आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाला वेगळं वळण लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केला जात असला तरी यात यश येणार नाही, अशी प्रतिक्रिया धनंजय देशमुख यांनी दिली आहे. काल धनंजय देशमुख यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
न्यायालयात 26 तारखेला संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे. या प्रकरणात ठराविक लोक हे आरोपींना वाचवण्यासाठी त्यांचं समर्थन करताना दिसत असल्याचं धनंजय देशमुख यावेळी म्हणाले. बीडमधले जुने व्हिडिओ आणि गुन्हे काढून त्यामधून माझ्या भावाच्या प्रकरणाला वेगळं वळण येईल का यासाठी प्रयत्न केला जात आहे, असंही धनंजय देशमुख यांनी म्हंटलं.
Published on: Mar 16, 2025 04:39 PM