Santosh Deshmukh Case : होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे.. ; ‘त्या’ फोटोवर धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया

| Updated on: Mar 15, 2025 | 4:41 PM

Dhananjay Deshmukh : संतोष देशमुख हत्या प्रकरणात सक्तीच्या रजेवर असलेले पोलीस अधिकारी काल याच प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांसोबत होळी खेळतानाचा एक फोटो अंजली दमानिया यांनी शेअर केला होता. त्यावर आज धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

माझ्या भावाचे हाल या आरोपींनी केले आहे. माझ्या भावाच्या अंगावर जे घाव यांनी केले. त्याच्या जखमांना झालेले काळेनिळे रंग, त्याच्या रक्ताचे डाग यातलं काहीही त्यांना आठवलं असतं, तर काल होळीचे रंग खेळण्याची त्यांची हिम्मत झाली नसती, अशी प्रतिक्रिया संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी दिली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींच्या सोबत फिरताना दिसणाऱ्या बीडच्या पोलीस अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेलं आहे. काल हेच पोलीस अधिकारी संतोष देशमुख हत्या प्रकरण ज्यांच्या न्यायालयात सुरू आहे त्या न्यायाधीशांसोबत होळीचे रंग खेळताना दिसले असल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला हे. त्यावर धनंजय देशमुख यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

पुढे बोलताना धनंजय देशमुख म्हणाले की, महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात हे प्रकरण गेलं. माझ्या भावाला न्याय मिळावा म्हणून आज प्रत्येकजण लढा देत आहे. आपल्याकडे लोकशाही आहे. कोणी कसं वागावं यावर बंधन नाही. मात्र जय आरोपींसोबत आपण फिरतो. जय गुन्ह्याचा रोख आपल्यावर आला आहे. त्यांना रंग उधळताना काहीही वाटलं नाही का? माणसं असं कसं करू शकतात? याचा मला त्रास झाला, असंही यावेळी धनंजय देशमुख यांनी म्हंटलं.

Published on: Mar 15, 2025 04:41 PM
Satish Bhosale : खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू
Solapur News : वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल