Dhananjay Mahadik यांचा मुलगा बापाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला
धनंजय महाडिक यांनी बाजी मारताच अनेकांनी विधानभवनात त्यांना शुभेच्या दिल्या. यावेळी धनंजय महाडिक यांचा मुलगा कृष्णराज हा भेटताना भावूक झाला तर तो गळ्यात पडून ढसाढसा रडला. सध्या याची चर्चा कोल्हापूरसह राज्यात होत आहे.
काल रात्रीच राज्यसभेच्या निकडणूकीचे निकाल लागले. त्यात महाविकास आघाडी सरकारला चांगलाच धक्का बसला. राज्यातील सहा जागांसाठी मतदान पार पडले आणि तब्बल 9 तांसाच्या प्रतिक्षेनंतर निकाल हा आला. त्यावेळी सहाव्या जागेसाठी चुरस पाहाला मिळाली. तर कोणाचा पत्ता कापला जाणार आणि कोणाच्या गळ्यात विजयाची माळ पडणामर याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. यापार पडलेल्या निवडणूकीत कोल्हारूच्या धनंजय महाडिक यांना गुलाल गाल्याने कोल्हापूरमध्ये जल्लोष साजरा केला गेला. तर त्यांचा मुलगा आणि त्यांची भेट ही अनेकांच्या चर्चेचा विषय बनला. धनंजय महाडिक यांनी बाजी मारताच अनेकांनी विधानभवनात त्यांना शुभेच्या दिल्या. यावेळी धनंजय महाडिक यांचा मुलगा कृष्णराज हा भेटताना भावूक झाला तर तो गळ्यात पडून ढसाढसा रडला. सध्या याची चर्चा कोल्हापूरसह राज्यात होत आहे.
Published on: Jun 11, 2022 08:30 PM