धंनजय मुंडे लोकसभा लढवणार? म्हणाले, “निवडणूक लढवण्यासाठी माझी…”

| Updated on: May 29, 2023 | 7:46 AM

महाविकास आघाडीची 2024 ची लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांची कथित यादी प्रसिद्ध झाली होती. या कथित यादीत राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचे देखील नाव होते. परळीत बॅनरवर संसद भवन लावल्यानंतर धनंजय मुंडे यांचं लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरतील या चर्चेला उधाण आले होते. मात्र बीडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्या चर्चेवर धनंजय मुंडे यांनी अखेर पडदा टाकला आहे.

बीड : येत्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. आपल्याला जास्तीत जास्त जागा कशा मिळतील यासाठी सर्वच पक्षांकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. दरम्यान महाविकास आघाडीची 2024 ची लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांची कथित यादी प्रसिद्ध झाली होती. या कथित यादीत राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचे देखील नाव होते. परळीत बॅनरवर संसद भवन लावल्यानंतर धनंजय मुंडे यांचं लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरतील या चर्चेला उधाण आले होते. मात्र बीडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्या चर्चेवर धनंजय मुंडे यांनी अखेर पडदा टाकला आहे.” माझ्यासाठी दिल्ली फार लांब आहे. मी लोकसभा निवडणूक लढविणार नाही”, असं धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केलंय. “लोकसभा उमेदवार म्हणून पक्षांनी माझ्यासोबत कसलीही चर्चा केली नाही. माझ्या दृष्टीने दिल्ली खूप दूर आहे. माझी लायकी लोकसभा लढविण्याची नाही. मी आणखीन खूप लहान आहे. असे सांगत धनंजय मुंडे यांनी तूर्तास तरी लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केले आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीत बीड मधून राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून येईल”, असा विश्वास मुंडे यांनी बोलून दाखविला आहे.

Published on: May 29, 2023 07:46 AM
‘शिंदे यांच्यावर काही बोललं की लगेच हे गूबू गूबू करतंय’अजित पवारांची कोणावर खरमरीत टिका?
नाशिकमधील वणीच्या सप्तश्रृंगी मंदिरात ड्रेस कोड लागू होणार?