Dhananjay Munde | निर्बंधाच्या काळातही अजित पवार यांनी बीड जिल्ह्यासाठी निधी कमी पडू दिला नाही, धनंजय मुंडे यांनी मानले आभार
Dhananjay Munde | निर्बंधाच्या काळातही अजित पवार यांनी बीड जिल्ह्यासाठी निधी कमी पडू दिला नाही, असे सांगत धनंजय मुंडे यांनी त्यांचे आभार मानले.
Dhananjay Munde | निर्बंधाच्या काळातही अजित पवार (Ajit Pawar) यांनी बीड जिल्ह्यासाठी निधी (Fund)कमी पडू दिला नाही, असे सांगत धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी त्यांचे आभार मानले. महाविकास आघाडीच्या काळात कोरोनाचे थैमान होते. महाविकास आघाडी सरकारने सर्वच पातळ्यावर चांगलं काम केलं. निर्बंध असताना, सरकारची अडचण असताना ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीड जिल्ह्यातील विकास कामांसाठी आणि कोरोना निपटण्यासाठी निधीची कमतरता भासू दिली नसल्याचे वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केले.
अजित पवारांनी पद कमावलं
यावेळी त्यांनी सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. उपमुख्यमंत्रीपद हे संवैधानिक नाही. अजित पवारांनी ते कमावलं, त्यांनी ते पद मिळवलं नसल्याचा चिमटा धनंजय मुंडे यांनी फडणवीस यांना काढला.