छगन भुजबळ यांच्यापाठोपाठ मंत्री धनजंय मुंडे यांना धमकीचा फोन; मागितली 50 लाखांची खंडणी!

| Updated on: Jul 11, 2023 | 2:58 PM

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना आज सकाळी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यापाठोपाठ अजित पवार गटातील आणखी एका आमदारा धमकीचा फोन आला आहे.

बीड : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना आज सकाळी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यापाठोपाठ अजित पवार गटातील आणखी एका आमदारा धमकीचा फोन आला आहे. मंत्री धनंजय मुंडे यांनाही धमकीचा फोन आला आहे. धनंजय मुंडे यांच्या परळीच्या घरी धमकीचा फोन आल्याची माहिती आहे. या फोनवरून मुंडे यांना धमकी देण्याबरोबरच पैशांचीही मागणी करण्यात आली आहे. 50 लाख रूपयांची मागणी या फोनवरून करण्यात आली आहे. धनंजय मुंडे यांना धमकीचा फोन आल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. आज सकाळपासून राज्याच्या राजकारणात धमकीच्या फोनचीच चर्चा होतेय.

Published on: Jul 11, 2023 02:58 PM
रावेरच्या अंगणात सासरे विरुद्ध सून, लोकसभेसाठी एकनाथ खडसे, रक्षा खडसे यांच्या विरोधात प्रचार करणार?
‘कलंका’वरून राजकारण पेलटं; उद्धव ठाकरे यांनी पुन्हा डिवचलं फडणवीस आणि भाजपला