मंत्री डॉ. तानाजी सावंत यांना त्यांच्या मतदार संघात दुसरा मोठा धक्का; धाराशिव बाजार समितीचा निकाल, पाहा व्हीडिओ…

| Updated on: Apr 29, 2023 | 12:51 PM

Agricultural Produce Market Committee Election Result 2023 : कृषी उत्पन्न बाजार समितीचा आज निकाल; धाराशिवमध्ये काय स्थिती? पाहा...

धाराशिव : मंत्री डॉ. तानाजी सावंत यांना त्यांच्या मतदार संघात दुसरा मोठा धक्का बसलाय. तानाजी सावंत यांच्या मतदार संघातील परंडा आणि वाशी बाजार समिती महाविकास आघाडीकडे तर सावंत यांना 3 पैकी 1 भुम बाजार समिती विजय झाला आहे. परंडा बाजार समितीतील पराभवनंतर वाशी बाजार समितीत मोठा पराभव झाला आहे. वाशी बाजार समितीमध्ये 18 पैकी 12 जागा मिळवून महाविकास आघाडीचा विजय झालाय. तर माजी आमदार राहुल मोटे यांच्या पॅनलने मंत्री सावंत पॅनलला पराभूत केलं आहे. भूम कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये मंत्री तानाजी सावंत याच्या पॅनलला यश मिळालंय. 6 जागा महायुती, 1 जागा महाविकास आघाडीकडे आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल मोटे यांना मोठा धक्का बसलाय. धाराशिव जिल्ह्यातील 8 बाजार समितीसाठी निवडणूक झाली. यात प्रत्येकी 18 संचालक मंडळातील 144 जागांसाठी 327 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी सरळ लढत होत आहे. तुळजापूर, धाराशिव, कळंब व भुम परंडा, उमरगा या ठिकाणी प्रतिष्ठेची लढत झाली.

Published on: Apr 29, 2023 12:51 PM
मुख्यमंत्री म्हणतात मी नाही, मग मॉरिशसमधून आदेश आला का? राऊतांचा निशाना फडणवीस यांच्यावर निशाना
बृजभूषण सिंह यांचा राजीनाम्यास नकार, आता आंदोलकांची भूमिका काय?