धाराशिवमधील अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची मुख्यमंत्र्याकडून पाहणी; बळीराजा मदतीच्या प्रतिक्षेत

| Updated on: Apr 11, 2023 | 2:05 PM

Dharashiv Unseasonal Rain Loss : धाराशिव आणि उमरगा या 2 तालुक्यात 16 मिमीच्या पुढे पाऊस पडला तर सर्वाधिक 2 हजार हेक्टर जमिनीचे नुकसान एकट्या धाराशिव तालुक्यात झालंय. या नुकसानीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली आहे. पाहा व्हीडिओ...

धाराशिव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत आहेत. एकनाथ शिंदे हे धाराशिव दौऱ्यावर आहेत. तुळजापूर तालुक्यातील मोर्डा इथल्या द्राक्ष बागेच्या नुकसानीची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. शेतकरी शिवाजी सुरवसे आणि सीताबाई सुरवसे यांची ही बाग होती. त्याची पाहणी मुख्यमंत्र्यांनी केली आहे. वाडी बामणी इथे गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीची त्यांनी पाहणी केली. धाराशिव जिल्ह्यातील 71 गावांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसला आहे. पहिल्या दिवशी झालेल्या पंचनाम्यात 2 हजार 571 हेक्टर जमिनीवरील पिकांचं नुकसान झाल्याचं समोर आलं आहे. आज तिसऱ्या दिवशीही महसूल आणि कृषी विभागाचे पंचनामे सुरु आहेत. पावसाचा 71 गावांना फटका बसला आहे. तर 38 घरांची पडझड झाली आहे. या सगळ्यात 3 नागरिक जखमी झाले आहेत. सरकारने मदत करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

Published on: Apr 11, 2023 02:04 PM
उद्धव ठाकरे यांच्या टीकेला चंद्रकांत पाटलांचं उत्तर; ‘तो’ व्हीडिओ दाखवत म्हणाले…
कोर्लईच्या माजी सरपंचाला अटक, रश्मी ठाकरे यांच्या अडचणी वाढणार?