शिंदे सरकारमध्ये देवेंद्र फडणवीसांचा अपमान- अनिल गोटे

| Updated on: Sep 26, 2022 | 9:10 AM

नुकतंच राज्यातील सर्व जिल्ह्यासाठी पालकमंत्री नेमण्यात आले आहेत. यावर माजी आमदार अनिल गोटे यांनी भाष्य केलंय.

गौतम बैसाने, Tv9 मराठी, प्रतिनिधी, धुळे : नुकतंच राज्यातील सर्व जिल्ह्यासाठी पालकमंत्री नेमण्यात आले आहेत. यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सहा जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद देण्यात आलं आहे. यावर माजी आमदार अनिल गोटे (Anil Gote) यांनी भाष्य केलंय. यात फडणवीसांचा अपमान झाल्याचं गोटे म्हणालेत. मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीसांकडे (Devendra Fadnavis) 36 जिल्हे होते. आता त्यांच्याकडे केवळ 6 जिल्हे देण्यात आले आहेत. शिंदे सरकारने देवेंद्र फडणवीस यांच्या अपमान केला आहे, असं अनील गोटे म्हणाले आहेत.

Published on: Sep 26, 2022 09:10 AM
कोल्हापुरात नवरात्र उत्सवाला सुरुवात, तोफ उडवत करवीर निवासिनी अंबाबाई सलामी
बापरे! विद्यार्थ्यांनी भरलेली स्कूल बस उलटली, विद्यार्थ्यांचं काय झालं? पालक चिंतेत