“शरद पवार यांनी आता थांबावं”, अजित पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्या सल्ला
अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादीचे दोन गट पडले आहेत. या दोन्ही गटाकडून काल मेळावे घेण्यात आले. या मेळाव्यात दोन्ही गटाच्या नेत्यांनी आरोप-प्रत्यारोप केले. अजित पवार यांनी तर चार गौप्यस्फोट करत शरद पवार यांच्या राजकारणाच्या खेळीची पोलखोल केली. यावेळी अजित पवार यांच्या गटाचे आमदार दिलीप बनवकर हे देखील उपस्थित होते.
नाशिक: अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादीचे दोन गट पडले आहेत. या दोन्ही गटाकडून काल मेळावे घेण्यात आले. या मेळाव्यात दोन्ही गटाच्या नेत्यांनी आरोप-प्रत्यारोप केले. अजित पवार यांनी तर चार गौप्यस्फोट करत शरद पवार यांच्या राजकारणाच्या खेळीची पोलखोल केली. यावेळी अजित पवार यांच्या गटाचे आमदार दिलीप बनवकर हे देखील उपस्थित होते. दरम्यान दिलीप बनकर यांनी पहाटेच्या शपथविधीवर भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, “विकासासाठी आम्ही अजितदादांबरोबर गेलो आहोत.कोणाच्या घरात भांडण लावणे हा आमचा उद्देश नाही. शरद पवार आमचे दैवत आहेत.मात्र आता त्यांनी थांबावं. जनतेला दिलेले आश्वासन पूर्ण करावे लागतात. विरोधात होतो तेव्हा सर्वच कामांना स्थगिती दिली. प्रलंबित कामे पूर्ण होण्यासाठी सत्तेत जावं लागलं. दादांना खूप सहन करावं लागलं. पहाटेच्या शपथविधी वेळी दादांचा अभिमन्यू झाला.”