Hijabच्या मुद्द्यावरून आंदोलन नको, Dilip Walse Patil यांचं जनतेला आवाहन
हिजाबच्या (Hijab) मुद्द्यावरून आता राज्यातली वाद सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) म्हणाले, की आपण आपल्या राज्यात जातीजातीमध्ये, धर्माधर्मात संघर्ष करू नये. हिजाबच्या प्रकरणावरून आंदोलन (Agitation) शक्यतो करू नये.
हिजाबच्या (Hijab) मुद्द्यावरून आता राज्यातली वाद सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेला आवाहन करताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) म्हणाले, की इतर राज्यात घडलेला विषय पकडून आपण आपल्या राज्यात जातीजातीमध्ये, धर्माधर्मात संघर्ष करू नये. हिजाबच्या प्रकरणावरून आंदोलन (Agitation) शक्यतो करू नये. आपण सर्वांनी शांतता पाळण्याचा दृष्टिकोन ठेऊन सहकार्य करावे. पोलिसांनी अशा घटनांवर लक्ष ठेवावे. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची दक्षता घ्यावी. जो सल्ला मी जनतेला दिला, राजकीय पक्षांनासुद्धा तेच सांगणार आहे, की विनाकारण या विषयावरून राज्यामध्ये शांती आहे. ती भंग करू नये. तसेच पोलिसांचे काम वाढवू नये. कर्नाटकातील हिजाबचा वाद आता इतर राज्यांतही पोहोचला आहे. विविध राज्यांत आंदोलने होत आहेत. महाराष्ट्रातही अशी आंदोलने होत आहेत. त्यांना शांततेचे आवाहन वळसे पाटील यांनी केले आहे.