संजय राऊत यांच्या ‘त्या’ कृत्यावर दिपाली सय्यद म्हणाल्या…

| Updated on: Jun 04, 2023 | 8:31 AM

शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर प्रश्न विचारताच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी थुंकण्याची क्रिया केली होती. राऊत यांनी केलेल्या कृत्याचा शनिवारी शिंदे गटाकडून निषेध व्यक्त करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ठाणे : शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर प्रश्न विचारताच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी थुंकण्याची क्रिया केली होती. राऊत यांनी केलेल्या कृत्याचा शनिवारी शिंदे गटाकडून निषेध व्यक्त करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “संजय राऊत यांची अवस्था अशी झालीय की, त्यांना आपण काय करतोय ते कळत नाही आहे.ज्यांच्या जीवावर ते खासदार झाले त्या खासदारकीचा त्यांनी राजीनामा द्यावा. संजय राऊत यांना असं कृत्य करणे शोभते का?मुख्यमंत्री हे चांगल्या प्रकारे काम करत आहेत, त्यांना त्यांना दाद देण्याची गरज आहे.मुख्यमंत्री यांच्या घरात घुसून त्यांच्या नातवावर, मुलावर टीका करतात ते योग्य नाही.संजय राऊत यांनी आता थांबलं पाहिजे”, असं दिपाली सय्यद म्हणाल्या. तसेच “शिवसेना या पक्षात मी प्रवेश केला होता आणि त्याच पक्षात मी आहे, त्यामुळे मला प्रवेश करण्याची गरज नाही”, असंही दिपाली सय्यद म्हणाल्या.

Published on: Jun 04, 2023 08:31 AM
Maharashtra Politics : राऊत यांनी अजित पवार यांच्यावर विधान केलं, राष्ट्रवादीचा नेता भडकला, म्हणाला, ‘मग…’
Special Report | थुकरट राजकारणानं संजय राऊत आणि अजित पवार यांच्यात पुन्हा जुंपली