“संजय राऊत यांनी मेंटल हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घ्यावी”, शिवसेनेचा खोचक सल्ला
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत याच्या कल्याण डोंबिवलीमधील कोव्हिड सेंटर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केल्यानंतर शिंदेंची शिवसेना आक्रमक झाली आहे. या आरोपांना शिवसेना युवासेना प्रदेश सचिव दीपेश म्हात्रे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
ठाणे: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत याच्या कल्याण डोंबिवलीमधील कोव्हिड सेंटर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केल्यानंतर शिंदेंची शिवसेना आक्रमक झाली आहे. या आरोपांना शिवसेना युवासेना प्रदेश सचिव दीपेश म्हात्रे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सुजित पाटकरवर ईडीच्या धाडी पडल्या, भ्रष्टाचाराचे आरोप झाला आहे. त्यामुळे संजय राऊत विचलित झाले आहेत. येत्या काळात सुजित पाटकर यांच्यासोबत कोणी भ्रष्टाचार केला, कोणाच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर झाले. हे सगळे उघडकीस होणार आहे. त्यामुळे संजय राउत विचलित झालेत. त्यामुळे ते असे स्टेटमेंट करतात असा पलटवार केला. संजय राऊत यांनी मेंटल हॉस्पिटलमध्ये चांगली ट्रीटमेंट घ्यावी असा सल्ला म्हात्रे यांनी राऊत यांना दिला आहे.
Published on: Jun 23, 2023 05:16 PM