Gangapur Dam in Nashik | गंगापूर धरणातून गोदावरी नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग

| Updated on: Jul 14, 2022 | 11:05 AM

तरीसुद्धा वाहनधारक पुलावर असलेल्या पुराच्या पाण्यातून जीव धोक्यात घालून वाहन घालण्याचे भलतेच धाडस करताना दिसत आहे.

निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला असून 50 हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग जायकवाडीच्या दिशेने गोदावरी नदी पात्रात करण्यात येत आहे. यामुळे निफाड-सिन्नर रस्त्यावर असलेल्या गोदावरी नदीच्या पुलावर मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी आल्याने वाहतुकीसाठी रस्ता बंद करण्यात आला आहे. तरीसुद्धा वाहनधारक पुलावर असलेल्या पुराच्या पाण्यातून जीव धोक्यात घालून वाहन घालण्याचे भलतेच धाडस करताना दिसत आहे. गंगापूर धरणातून गोदावरी नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे.

Published on: Jul 14, 2022 11:02 AM