भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी ‘या’ नेत्याच्या नावाची चर्चा
भाजपाचे सध्याचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचा कार्यकाळ संपल्यानंतर नवे अध्यक्ष कोण? याबाबत भाजपाच्या गोटात चर्चेला सुरुवात झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
नवी दिल्ली : भाजपाच्या (BJP) राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत मोठी बातमी समोर येत आहे. भाजपाचे सध्याचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांनाच पुन्हा एकदा अध्यक्ष म्हणून संधी मिळण्याची शक्यता आहे. जेपी नड्डा हेच पुन्हा एकदा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकतात अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 2024 च्या निवडणुका (Lok Sabha Election) नड्डा यांच्याच नेतृत्वाखाली लढवल्या जाणार आहेत. सध्या भाजपामध्ये अध्यक्ष बदलाबाबत कोणतीही चर्चा नसल्यानं, जेपी नड्डा हेच पुन्हा एकदा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष होण्याची दाट शक्यता आहे. भाजप 2024 च्या निवडणुका नड्डा यांच्याच नेतृत्वाखील लढवण्याची शक्याता आहे.
Published on: Sep 29, 2022 09:25 AM