Aditya Thackeray : दिशा सालियान प्रकरण: वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?

| Updated on: Mar 25, 2025 | 11:55 PM

Disha Salian Case Updates : दिशा सालियान प्रकरणात वकील ओझा यांनी आज आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यावर आता आदित्य ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

आदित्य ठाकरे हे ड्रग्सच्या व्यापारात सहभागी आहेत. तसंच उद्धव ठाकरे देखील आरोपी असल्याचा खळबळजनक आरोप वकील निलेश ओझा यांनी केला आहे. आदित्य ठाकरे यांना वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा वापर केला, असं देखील ओझा यांनी म्हंटलं आहे. दिशा सालियान मृत्यू प्रकरणी दिशाचे वडील सतीश सालियान आणि वकील निलेश ओझा यांनी आज पोलीस आयुक्तांची भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे गंभीर आरोप केलेल आहे. तर या संपूर्ण आरोपांवर बोलताना आदित्य ठाकरे यांनी, त्यांना जे बोलायचं ते बोलत राहुदे, मी काहीही बोलणार नाही, असं म्हंटलं आहे.

Published on: Mar 25, 2025 11:54 PM
Sushma Andhare : देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; सुषमा अंधारेंनी लिहिल मुख्यमंत्र्यांना पत्र
Saamana Editorial : ‘नव्या बाटलीत जुनीच दारू, त्यात नवं काय?’ कामराचं ‘ते’ गाणं अन् ‘सामना’तून सरकारला डिवचलं