Arvind Sawant | खातेवाटपात शिंदे गटाचा भ्रमनिरास, अरविंद सावंत यांचा शिंदे गटाला टोला

| Updated on: Aug 15, 2022 | 4:31 PM

Arvind Sawant | खाते वाटपात शिंदे गटाचा भ्रमनिरास झाल्याचा टोला शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी शिंदे गटाला लगावला.

Arvind Sawant | नव्याने स्थापन झालेल्या सरकारमध्ये खाते वाटपात (Ministry allocation) भाजपला (BJP) झुकते माप मिळाले तर शिंदे गटाचा (Shinde Group) भ्रमनिरास झाल्याचा टोला शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी लगावला आहे. लोकांची स्वप्ने असतात असे सांगत त्यांनी जाने वो कहसे लोग थे जिनके प्यार को प्यार मिला, या गाण्याची आठवण करुन देत शिंदे गटातील बंडखोर आमदारांना (Rebel MLA) डिवचले. त्यांना हवी असलेली खाते न मिळाल्याने आणि खातेवाटपात भाजपचा वरचष्मा असल्याने शिंदे गटातील आमदारांचा भ्रमनिरास झाल्याचा चिमटा सावंत यांनी काढला. शिंदे गटातील आमदारांची आता काँटो का हार मिला अशी अवस्था झाल्याचा टोला ही त्यांनी हाणला. तर ज्यांचा अद्यापही मंत्रिमंडळात प्रवेश झाला नाही, त्यांनी समजून घ्यावे की उरलं सुरल त्यांच्या पदरात पडणार आहे, अशी मार्मिक कोपरखळी ही त्यांनी लगावली.

Published on: Aug 15, 2022 03:28 PM
Kishori Pednekar | राजकारणाचा स्तर घसरत चालला आहे, शिंदे-फडणवीस सरकारला किशोरी पेडणेकरांचा टोला
Sachin Ahir on Cabinet | सगळी चांगली खाती भाजपच्या गोटात, सचिन अहिर यांनी ही साधला निशाणा