Special Report | आधी मविआवर टीका आणि आता काय सुरू युतीत 22 हट्ट की ठिणगी?

| Updated on: May 27, 2023 | 9:11 AM

भाजप आणि शिवसेनेत (शिंदे गट) आगामी लोकसभा निवडणुकीतील जागा वाटपावरून वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने 2019 मध्ये लढवलेल्या 23 पैकी 22 जागांवर दावा सांगितला आहे.

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीतील जागा वाटपावरून याच्याआधी महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली होती. त्यावरून राज्यात मोठा भाऊ छोटा भाऊ नाट्य रंगलं होतं. त्यावरून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना आणि भाजपने मविआवर चांगलीच टिका केली होती. त्याचदरम्यान आता टिका करणाऱ्यांच्याच घरातले वासे आता कमकूवत झाले की काय अशी शंका उपस्थित केली जात आहे. कारण भाजप आणि शिवसेनेत (शिंदे गट) आगामी लोकसभा निवडणुकीतील जागा वाटपावरून वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने 2019 मध्ये लढवलेल्या 23 पैकी 22 जागांवर दावा सांगितला आहे. तर भाजपकडून शिवसेना शिंदे गटाच्या 13 खासदारांना सापत्न वागणूक दिली जात असल्याचा दावा खासदार गजानन कीर्तिकर यांनी केला आहे. त्यावरून आता युतीतच आलबेल असल्याच्या चर्चा सुरू आहेत. तर या वादावर युतीत काय निर्णय होणार याकडेही अनेकांचं लक्ष लागलं आहे.

Published on: May 27, 2023 09:11 AM
अंबादास दानवे यांचा हल्लाबोल…संजय शिरसाट यांची ‘ती’ इच्छा अपूर्ण राहणार, तर शिवसेनेला 2 जागाही मिळणार नाहीत!
राज्यात मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता? या ”चार” मंदिरांमध्ये फक्त भारतीय संस्कृतीचे….