Special Report | ‘हिंदुत्वा’वरून आरपार, ठाकरे V/s ठाकरे
राज ठाकरेंची सभा होतेय, त्यामुळे त्यांना आता आठवण आली की आपण हिंदू आहोत. पण बुंद से ग ई ओ हौद से नही आती. जेव्हा बाबरी मस्जिद पाडली गेली राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंच्या सोबत महाराष्ट्रात फिरत होते, असे मनसे नेते संदिप देशपांडे यांनी म्हटले आहे.
मुंबई : महाराष्ट्रात हिंदुत्वावरुन ठाकरे विरुद्ध ठाकरे असा सामना रंगलाय. बाबरी मशिद पाडली तेव्हा राज ठाकरे कुठे होते ? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला आहे. यानंतर मनसेकडूनही उत्तर देण्यात आलं आहे. गजनीसारखी अवस्था मुख्यमंत्र्यांची झाली आहे. उद्धव ठाकरेंना कार्याध्यक्षपदाचा प्रस्ताव हा राज ठाकरेंनी ठेवला. हे उपकार म्हणा किंवा राज ठाकरेंची चुक ही हे त्यांनी विसरू नये. राज ठाकरेंची सभा होतेय, त्यामुळे त्यांना आता आठवण आली की आपण हिंदू आहोत. पण बुंद से ग ई ओ हौद से नही आती. जेव्हा बाबरी मस्जिद पाडली गेली राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंच्या सोबत महाराष्ट्रात फिरत होते, असे मनसे नेते संदिप देशपांडे यांनी म्हटले आहे.