Special Report | शिवेंद्रराजे-उद्यनराजे यांच्यात पुन्हा वाद सुरु
सातारा नगरपालिकेची निवडणूक जवळ आल्यानंच सुरु झाल्याचा आरोप शिवेंद्रराजेंनी( Shivendraraje ) केला. 2016 सालच्या सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीत उदयनराजेंच्या पॅनेलला 22 तर शिवेंद्रराजेंच्या पॅनेलला 12 जागा मिळाल्या होत्या. थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उदयनराजेंच्या कार्यकर्त्या माधवी कदम यांनी शिवेंद्रराजेंच्या पत्नी वेदांतिकाराजेंचा धक्कादायक पराभव केला होता. या पराभवाची सल शिवेंद्रराजेंच्या मनात अजूनही आहे. उदयनराजे खासदारकी लढवतातआणि शिवेंद्रराजे आमदारकी. त्यामुळं या दोन्ही निवडणुकांवेळी शक्यतो वादावादी होत नाही. पण नगरपालिकेचा विषय आल्यावर मात्र दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु होतात.
सातारा : साताऱ्यातल्या दोन्ही राजेंमध्ये कधी वैर उफाळून येईल आणि कधी प्रेमाला बहर येईल हे कुणीही सांगू शकत नाही. आताही तेच झालंय. दोन्ही राजेंमध्ये पुन्हा आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. खासदार उदयनराजे भोसले(Udyanraje) सध्या दिल्लीत आहेत. दिल्लीत ते केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. 22 जुलैला उदयनराजेंनी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंची भेट घेतली आणि कास परिसराचा विकास करण्यासाठी त्यांचीशी चर्चा केली. 23 जुलैला उदयनराजे थेट राष्ट्रपतींना भेटून त्यांचं अभिनंदन केलं आणि द्रौपदी मुर्मू यांनीही साताऱ्याला भेट देण्याचं आश्वासन दिल्याची पोस्ट केली. 24 जुलैला उदयनराजेंनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांची भेट घेतली आणि साताऱ्याच्या पर्यटनाकरता 1500 कोटींची तरतूद करण्याची मागणी केली. 26 जुलैला उदयनराजे केंद्रीय मंत्री हरदीपसिंह पुरी यांना भेटले आणि सातारा नगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेसाठी 87 कोटी रुपये देण्याची मागणी केली. 27 तारखेला त्यांनी नितीन गडकरींची भेट घेतली आणि अजिंक्यताऱ्यावर उभारण्यात येणाऱ्या रोपवेबद्दल विस्तृत चर्चा केली. उदयनराजेंच्या या भेटीगाठी केवळ सातारा नगरपालिकेची निवडणूक जवळ आल्यानंच सुरु झाल्याचा आरोप शिवेंद्रराजेंनी( Shivendraraje ) केला. 2016 सालच्या सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीत उदयनराजेंच्या पॅनेलला 22 तर शिवेंद्रराजेंच्या पॅनेलला 12 जागा मिळाल्या होत्या. थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उदयनराजेंच्या कार्यकर्त्या माधवी कदम यांनी शिवेंद्रराजेंच्या पत्नी वेदांतिकाराजेंचा धक्कादायक पराभव केला होता. या पराभवाची सल शिवेंद्रराजेंच्या मनात अजूनही आहे. उदयनराजे खासदारकी लढवतातआणि शिवेंद्रराजे आमदारकी. त्यामुळं या दोन्ही निवडणुकांवेळी शक्यतो वादावादी होत नाही. पण नगरपालिकेचा विषय आल्यावर मात्र दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु होतात. नगरपालिकेच्या निवडणुकीत दोघांनीही एकमेकांचा हिशेब चुकता करण्याचा प्रण केलाय. बघुयात सातारकर कुणाचा हिशेब करतायत ते.