‘वाघनखं कर्जावर नको कायमस्वरूपी आणा’, ठाकरे गटाच्या नेत्याने भाजपला फटकारलं

| Updated on: Oct 05, 2023 | 6:42 PM

महाराष्ट्रात ज्यावेळी महामारी होती तेव्हा उद्धव ठाकरे यांनी संकटातून महाराष्ट्र सुखरूप बाहेर काढला. मात्र, आता तसे कोणतेही संकट नाही. नांदेडची घटना दुर्दैवी आहे. जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे. आता आरोग्य खात्याकडे प्रशासनाचे लक्ष नाही का?

बुलढाणा : 5 ऑक्टोबर 2023 | ज्या वाघनखाने छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला. ते वाघनख अद्याप साताऱ्याचे राजघराणे यांच्या ताब्यात आहेत. तसे पुरावे, नोंदी आणि छायाचित्र उपलब्ध आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी एक नव्हे तर अनेक वाघनखे बनविली. त्यातील एक ग्रंड डपला मिळाले होते. याच वाघनखाने अफजल खानाचा कोथळा काढला याचा कुठलाही पुरावा नाही. वाघनखं भारतात परत येते याचा आनंद आहे. त्याचप्रमाणे कोल्हापूरचे चौथे शिवाजी महाराज यांनी वापरलेली जगदंबा तलवारसुद्धा इंग्लंडवरून परत आणावी. शिवाय वाघनखं कर्जावर परत न आणता कायमस्वरूपी परत आणावं अशी मागणी उद्धव ठकारे गटाचे उपनेते नितीन बानगुडे पाटील यांनी केलीय. शिवसेनेचा दसरा मेळावा याची ओळख ‘एक नेता, एक मैदान, एक पक्ष’ अशी आहे. महाराष्ट्रात नव्हे तर देशात गेली ४६ वर्ष हे चालत आलं आहे. आताही ते बदलणार नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच दसरा मेळावा शिवाजी पार्क मध्ये होणार आणि त्याच ताकदीने होणार असेही त्यांनी सांगितले.

Published on: Oct 05, 2023 06:42 PM
तीन पक्षाचे तीन नेते, महाविकास आघाडीच्या समन्वय समितीत कुणाचा आहे समावेश?
सुप्रिया सुळे घालणार अजितदादांना हार, खोचक टीका की खरंच करणार अभिनंदन?