श्रीमंतीची शायनिंग मारू नका… जरांगे पाटील कुणावर भडकले?
त्यांचं जास्तीचं रान चाललं आहे. यांना जास्तीचं रान खायची आहे. तुम्ही काही ज्ञान पाजळायची गरज नाही. उगाच श्रीमंतीची शायनिंग मारू नका. मराठ्यांनी कुठलं आऱक्षण घ्यायचं ते मराठा ठरवतील बाकी कुणी नाही.
जालना | 8 नोव्हेंबर 2023 : धनगर समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी मराठ्यांनी कुठले आरक्षण घ्यावे याचा सल्ला देऊ नये. मराठ्यांनी कुठलं आऱक्षण घ्यायचं ते मराठा ठरवतील बाकी कुणी नाही असे मनोज जरांगे पाटील यांनी बजावले. कुणबी समाजाचे जे पुरावे आहेत ते जुने आहे. ते काही 2023 ची थोडे पुरावे आहेत. मराठे, ओबीसी 1967 पासून आहे. पण, त्यांचं जास्तीचं रान चाललं आहे. यांना जास्तीचं रान खायची आहे अशी टीकाही त्यांनी मंत्री भुजबळ यांच्यावर केली. मंत्री तानाजी सावंत यांना टोला लगावताना जरांगे पाटील म्हणाले, त्यांना काय वादळ दिसलं मला माहिती नाही. तानाजी सांवताचं वक्तव्य म्हणजे शोकांतिका आहे. मराठा समाजावर प्रेम असायला पाहिजे. तुम्ही काही ज्ञान पाजळायची गरज नाही. उगाच श्रीमंतीची शायनिंग मारू नका. आंदोलन होत होते तेव्हा तानाजी सावंत झोपले होते का? वेळ आल्यावर सांगतो. गोरगरिबांची चेष्टा आहे आणि पैशांची मस्ती आहे. सरकारचे शिष्टमंडळ आम्ही उद्या येतो असं सांगितलेलं आहे. उद्या म्हणत असतील तर त्यांना येवू द्या. कुणावर टीका करण्यासाठी मी बोलत नाही असेही ते म्हणाले.