Sanjay Shirsat | काही टेन्शन घेऊ नका मी मंत्रिमंडळात नक्की राहील, आमदार संजय शिरसाट यांचा विश्वास

| Updated on: Aug 12, 2022 | 6:32 PM

Sanjay Shirsat | काही टेन्शन घेऊ नका मी मंत्रिमंडळात नक्की राहील, असा विश्वास आमदार संजय शिरसाट यांनी व्यक्त केला.

Sanjay Shirsat | काही टेन्शन घेऊ नका मी मंत्रिमंडळात (Ministry) नक्की राहील, असा विश्वास आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी व्यक्त केला. पण संपूर्ण उठावात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना जोरदार साथ दिल्यानंतर, तसेच मंत्र्यांच्या नावाच्या यादीत आघाडीवर नाव असताना रात्रीतून अशी काय जादूची कांडी फिरली की, शिरसाट यांचा पत्ता कट झाला याविषयी माध्यमांनी त्यांना छेडले? त्यावर उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळवण्यासाठीच्या यादीत ही आपलं नावं होतं. पण त्यांनी अडीच वर्षात आपल्याला का मंत्रिपद दिलं नाही, हे विचारु शकत नसल्याचं त्यांनी यावेळी सांगतिले. परंतू, येत्या काही दिवसात मंत्रीमंडळाचा विस्तार होणार आहे. पावसाळी अधिवेशनानंतर (Monsoon Session) त्याला मुहुर्त लागणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याला शब्द दिला आहे आणि ते शब्दाचे पक्के असल्याचे सांगत चिंता करु नका मी नक्की मंत्री पदाची शपथ घेईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Published on: Aug 12, 2022 06:32 PM
Uday Samant | मुख्यमंत्र्यांनी प्रस्थापितांविरोधात लढा देऊन यशश्री खेचून आणली, उदय सामंत यांचा मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वावर विश्वास
Manisha Kayande | अधिवेशनात शिवसेना सरकारला घेरणार, मनिषा कायंदे यांचे वक्तव्य