नाना अधिवेशनाची वाट पाहू नका, आताच सांगा.., मंत्री दादा भुसे का संतापले?
सामना आधी पवित्र वृत्तपत्र होते. आम्ही ते देवासारखे मानत होतो. मात्र, आता ते तसे राहिले नाही. आता जे संपादक आहेत त्यांनी तसे ठेवले नाही अशी टीका त्यांनी केली.
नाशिक : 9 ऑक्टोबर 2023 | मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. टोल संबंधी त्यांना सविस्तर माहिती दिली जाईल. वस्तुस्थिती सांगितली जाईल. देवेंद्र फडणवीस यांनी काही उदाहरण देऊन याबाबत सांगितले आहे. मुंबईत 3 चाकी, 2 चाकी ट्रॅकटर यांना टोल माफी आहे, अशी माहिती मंत्री दादा भुसे यांनी दिली. नाशिकमधील कोणार आमदार कोणत्या प्रकरणात अडकला आहे. त्याची अधिकची माहिती नाना पटोले यांच्य्कडे असेल तर त्यांनी अधिवेशनाची वाट पाहू नये. ती माहिती माध्यमाना सांगावी, नाव जाहीर करावे. सरकारवर विश्वास नसेल तर पोलीस ठाण्यात तक्रार करावी. जे आमदार असतील त्याचे नाव समोर आणावे असे ते म्हणाले. सामना हे बाळासाहेब यांनी सुरू केलेले आहे.
Published on: Oct 09, 2023 10:16 PM