‘xx मारायला मंत्रिपद घेता का?’, विरोधी पक्षनेते कुणावर संतापले?
मंत्री शंभूराजे यांनी महिलांना धमकी देणे म्हणजेच यात काही सत्यता आहे. वास्तविकता आहे आणि ते स्वीकारू शकत नाही. लपवू शकत नाही म्हणून उद्रेकातून त्यांचा तोल गेला असावा. म्हणूनच त्यांनी धमकी दिल गेली असेल. सत्य हे सत्यच आहे असे ते म्हणाले.
मुंबई | 19 ऑक्टोंबर 2023 : ललित पाटील याला अशी कुठली बिमारी होती की इतके महिने तो हॉस्पिटलमध्ये होता? पैसे घेऊन कोणी नोकरी धोक्यात घालत नाही. याला राजकीय दबाव आहे. आमच्याकडेही काही माहिती आहे. पण, मी नाव घेणार नाही, असा इशारा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिला. काही हेवीवेट मंत्र्यांचे फोन गेले. आरोग्य यंत्रणेबाबत जर विधानसभा अध्यक्षांना अहवाल मागवावा लागत असेल तर सरकार झोपले आहे का? सरकारचा आरोग्य खातं व्हेंटिलेटरवर आहे का? की वसुली करण्यामध्ये हे सगळे गुंतलेले आहे अशी टीका त्यांनी केली. आरोग्यमंत्री काय करत आहे. यांची यंत्रणा काय करत आहे. झक मारायला मंत्रिपद घेतात का अशी जळजळीत टीकाही त्यांनी केली.
Published on: Oct 19, 2023 08:33 PM