शदर पवार यांची आणखीन एका नेत्याने साथ सोडली; बीडचा आणखीन एका पुतण्या अजित पवार गटात

| Updated on: Aug 23, 2023 | 3:27 PM

बीडमध्ये पुन्हा एकदा शरद पवार यांना धक्का बसला आहे. तर अजित पवार गटात येथील आणखी एक पुतण्या प्रवेश करणार आहे. त्यामुळे बीडमधील दोन पुतणे हे शरद पवार यांच्याविरोधात अजित पवार यांना ताकद देणार आहेत.

मुंबई : 23 ऑगस्ट 2023 | अजित पवार आणि शरद पवार असे गट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तयार झालेत. तर अजित पवार गटात नेत्यांची इनकमिंग सुरू असून शरद पवार गटाला खिंडार पडणे सुरूच आहे. बीडमध्ये एक नेता अजित पवार गटात प्रवेश करणार आहे. तर तो देखील येथील शरद पवार गटातील एका नेत्याचा पुतण्याच आहे. त्यामुळे या प्रवेशाची जोरदार चर्चां रंगली आहे. जयदत्त क्षीरसागर यांचे दुसरे पुतणे डॉक्टर योगेश क्षीरसागर हे अजित पवारांच्या गटात प्रवेश करत आहेत. त्यामुळे बीडच्या काका पुतण्यात पुन्हा राजकीय संघर्ष पेटणार आहे. क्षीरसागर यांचा एक पुतण्या काका शरद पवार पवार यांच्या सोबत आहे, तर दुसरा पुतण्या आता शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांच्या सोबत जाणार असल्याचे राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

Published on: Aug 23, 2023 03:26 PM
मुख्यमंत्री शिंदे यांची मध्यरात्री ‘केईएम’ला भेट अन् नुतनीकरणाच्या कामाला युद्धपातळीवर सुरूवात
‘चुकीला माफी पण…’, उद्धव ठाकरे यांचा बंडखोरांना इशारा, नेमकं काय म्हणाले?