घरगुती गॅस सिलिंडर पुन्हा महागला
घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. गेल्या 15 दिवसांत एलपीजी सिलिंडरचे दर दोनदा वाढवण्य़ात आले आहेत. आज गॅसचे दर साडेतीन रुपयांनी वाढवण्यात आले आहेत.
महागाईचा आणखी एक झटका सामान्य नागरिकांना बसला आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात साडेतीन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तर दुसरीकडे व्यवसायिक सिलिंडरचे दर देखील आज आठ रुपयांनी वाढवण्यात आले आहेत. यापूर्वी सात मे रोजी घरगुती सिलिंडरच्या दरात 5o रुपयांची वाढ करण्यात आली होती.
Published on: May 19, 2022 09:49 AM