Shirdi साईबाबांच्या चरणी 3 दिवसांत साडेचार कोटींचं दान
साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी भाविक गर्दी करत असल्याचे पहायाला मिळत आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये तब्बल पावणे तीन लाख भाविकांनी साई बाबांच दर्शन घेतलं आहे. साई बाबांच्या चरणी येणाऱ्या दानामध्ये देखील मोठ्याप्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये साई बाबांच्या चरणी भाविकांनी तब्बल साडेचार कोटी रुपयांचे दान अर्पण केले आहे.
शिर्डी : साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी भाविक गर्दी करत असल्याचे पहायाला मिळत आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये तब्बल पावणे तीन लाख भाविकांनी साई बाबांच दर्शन घेतलं आहे. साई बाबांच्या चरणी येणाऱ्या दानामध्ये देखील मोठ्याप्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये साई बाबांच्या चरणी भाविकांनी तब्बल साडेचार कोटी रुपयांचे दान अर्पण केले आहे. काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारकडून कोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. निर्बंध हटवण्या पूर्वी दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांच्या संख्येवर मर्यादा होती. मात्र आता ही मर्यादा हवटवण्यात आल्याने मोठ्या संख्येने भाविक शिर्डित दाखल होत आहेत.