‘गाढव गेलं आणि ब्रम्हचारही गेलं, शिवतीर्थावर शिमगा मेळावा’, मुख्यमंत्री शिंदे यांचा ठाकरे गटाला टोला

| Updated on: Oct 23, 2023 | 11:35 PM

मुख्यमंत्री शिंदे यांनी आझाद मैदानात रामलीला समितीच्या कार्यक्रमाला भेट दिली. यावेळी बोलताना त्यांनी ठाकरे गटावर सडकून टीका केली. मोदीजी आणि आमच्यावर टीका करणारा हा मेळावा असेल असे मुख्यमंत्री म्हणाले.

मुंबई | 23 ऑक्टोंबर 2023 : रामलीला समितीकडून आझाद मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सन्मान करण्यात आला. मुख्यमंत्री शिंदे यांनी रामलीला समितीच्या कार्यक्रमाला भेट दिली. त्यावेळी त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर जोरदार टीका केली. ठाकरे यांचा शिवतीर्थावर मेळावा होणार आहे. पण, तो शिमगा मेळावा होणार आहे. मोदीजी आणि आमच्यावर टीका करणारा हा मेळावा असेल. हा मेळावा शिमग्याला करायला पाहिजे. शिमग्याला सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत मेळावा घ्यायला पाहिजे, असा टोलाही त्यांनी लगावला. गाढव गेलं आणि ब्रम्हचारही गेलेलं आहे. रामलीला, अयोध्या आणि राम मंदीर आमच्यासाठी श्रध्देचा विषय आहे. अशा प्रकारे आपली संस्कृती पुढे नेण्याचे नियोजन चांगलं केलं आहे. न भूतो न भविष्यती असा रेकोर्ड मोडणारा दसरा मेळावा होईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

 

Published on: Oct 23, 2023 11:17 PM
Pankaja Munde : आपण मरणारे नसून…, पंकजा मुंडे यांनी मराठा तरुणांना काय केले आवाहन?
मराठा आरक्षणाचा चक्रव्यूह सरकार भेदणार तरी कसा? सरकारची झाली कोंडी?